FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच मोठा वाद; इराणचा अमेरिकेवर गंभीर आरोप, तिकीट कोटा रद्द केल्याचा दावा

FIFA World Cup Controversy : क्रीडा जगतातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच फिफा फुटबॉल वर्ल्ड कप (FIFA World Cup 2026) सुरू होण्यासाठी आता अवघे दोनच दिवस उरले आहेत. मात्र, हा फुटबॉल महाकुंभ सुरू होण्यापूर्वीच एक आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झाला आहे. इराण फुटबॉल फेडरेशनने (FFIRI) अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून थेट यजमान देश अमेरिकेवर (USA) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

या वर्षी फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश संयुक्तपणे भूषवत आहेत. इराण फुटबॉल फेडरेशनचा असा आरोप आहे की, अमेरिकेने राजकीय द्वेषापोटी इराणच्या ग्रुप स्टेज मॅचेसच्या तिकिटांचं वाटप (Ticket Allocation) अचानक रद्द केलं. अमेरिकेकडून मुद्दामहून इराणी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यापासून रोखलं जात असल्याचा दावा इराणने केला आहे.

Iran Football Federation Statement : अमेरिकेकडून इराणी समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न

मंगळवारी एक विशेष निवेदन जारी करताना इराण फुटबॉल फेडरेशनने (FFIRI) अमेरिकेच्या या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी म्हटलं की, “फिफा वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी अवघे 2 दिवस उरले आहेत. अशा वेळी अमेरिकेने ग्रुप स्टेजमधील इराणच्या तिन्ही सामन्यांच्या ठिकाणी इराणी समर्थकांना येण्यापासून रोखण्यासाठी जाणूनबुजून अडथळे निर्माण केले आहेत. तसेच, इराणच्या काही सपोर्ट स्टाफ सदस्यांना अमेरिकेने व्हिसा (Visa) देण्यासही स्पष्ट नकार दिला आहे.”

फिफाच्या (FIFA) अधिकृत नियमांनुसार, प्रत्येक सामन्याच्या एकूण तिकिटांपैकी किमान 8 टक्के तिकिटे ही संबंधित देशाच्या फेडरेशनला मिळणे अनिवार्य आहे, जेणेकरून ते आपल्या समर्थकांना तिकिटे वाटू शकतील.

इराण फुटबॉल फेडरेशनच्या माहितीनुसार, त्यांनी अमेरिकेत होणाऱ्या आपल्या ग्रुप मॅचेसच्या तिकीट विक्रीची प्रक्रिया आधीच सुरू केली होती. मात्र, अमेरिकेने अचानक इराणला मिळणारा हा हक्काचा कोटा परत (Withdraw) घेतला आहे. त्यामुळे आता इराण आपल्या एकाही समर्थकाला तिकीट देण्याच्या स्थितीत उरलेला नाही.

FIFA Group G : ‘ग्रुप जी’ मध्ये इराणचा संघ

इराण आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध (Diplomatic Relations) गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत ताणलेले आहेत, ज्याचा फटका आता खेळाडूंना आणि चाहत्यांना बसत आहे. यापूर्वी, अमेरिकेच्या विमानतळावर इराक फुटबॉल संघाच्या एका खेळाडूला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले होते आणि तब्बल 7 तासांच्या कसून चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली होती.

या आगामी फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये इराणच्या फुटबॉल संघाचा समावेश ‘ग्रुप जी’ (Group G) मध्ये करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये इराणचा सामना प्रामुख्याने बेल्जियम, इजिप्त आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांशी होणार आहे. मात्र, या गंभीर तिकीट वादामुळे आता फिफा या प्रकरणात काय मध्यस्थी करणार, याकडे संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top